“शाळेची पायरी”

कोकणातल्या एका लहानशा गावात लताबाई नावाची वृद्ध महिला राहत होती. वयाच्या साठीनंतरही ती प्रत्येक सकाळी आपल्या घरासमोरील अंगण झाडून ठेवायची, भांडी घासायची, आणि शाळेच्या घंटा वाजेपर्यंत वाट बघायची. का, हे कोणालाच समजायचं नाही. लताबाईचं शिक्षण लहानपणीच बंद झालं होतं. वयाच्या दहाव्या वर्षीच तिला घरकामासाठी ठेवण्यात आलं आणि पुढे लग्न झालं. पण शिक्षणाविषयीचं तिचं आकर्षण काही…

पुढे वाचा

खारीचा वाटा

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती.  ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पुल/ ब्रिज) बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर…

पुढे वाचा

“दादा सरांचं डिजिटल शिक्षण मिशन”

“गावातील एका शिक्षकाने इंटरनेटचा योग्य वापर करून शाळेला टेक्नोलॉजीशी जोडले.” धुळे जिल्ह्यातील एका खेडेगावातले दादा सर (श्री. दत्तात्रय पाटील) हे एक साधे शिक्षक. शाळेत फळ्यावर शिकवणं, वहीतून प्रश्न सोडवणं आणि गावातील मुलांना शिकवणं – एवढंच त्यांचं जग. पण जेव्हा कोरोना काळात शाळा बंद झाल्या, तेव्हा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. पण दादा सर थांबले नाहीत….

पुढे वाचा
Manjar

दृष्ट मांजर

जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती.पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते. मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत…

पुढे वाचा

प्रामाणिक रघूची भेट

एक होता रघू. तो एका लहानशा खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते आणि रघूला लहानपणापासून मेहनतीची व प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली होती. तो रोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आईला घरकामात मदत करायचा, आणि वडिलांसोबत शेतातही जात असे. रघूचा स्वभाव फारच सरळ आणि सच्चा होता. त्याला खोटं बोलायला अजिबात आवडत नसे. मित्रांमध्येही तो नेहमी इमानेइतबारे…

पुढे वाचा
mungi Ani Kabutar

कबुतर आणि मुंगी 

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

झाडावरची फुलं

एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मारायला आणि आराम करायला येत. झाडावरची फुलं इतकी सुंदर आणि रंगीत होती की, त्यांचा सुगंध दूरवर पसरत असे. गावात एक छोटा मुलगा होता, त्याचे नाव चिंटू. चिंटू…

पुढे वाचा

बोलकं ढग आणि शेतकऱ्याचं स्वप्न

एकदा एका कोरड्या प्रदेशात, जिथे पाऊस कधीच पडत नव्हता, तिथे एक गरीब शेतकरी राहायचा. त्याचं नाव होतं शांताराम. शांतारामला शेती करायची खूप इच्छा होती, पण पाणी नसल्यामुळे त्याची जमीन नेहमी ओसाड राहायची. तो रोज आकाशाकडे पाहायचा आणि ढगांना विनवणी करायचा. एक दिवस, आकाशात एक लहानसा, करडा ढग तरंगत होता. तो ढग इतर ढगांसारखा नव्हता; त्याला…

पुढे वाचा
man and boy

मूर्ख मुलगा आणि मध माशी – (Mashi Ani Mulga)

एका गावात एक सुतार होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता. सुताराचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते त्याला त्रास देते. सुताराचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि सुताराला चावे घेऊ लागते. सुतार मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा सुताराच्या डोक्यावर बसून…

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा