राजर्षी छत्रपती शाहु महाराज

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे महान समाजसुधारक आणि आधुनिक विचारांचे राजे होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासवर्गीय घटकांसाठी अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. त्यांच्या कार्यामुळे त्यांना “राजर्षी” हा मान मिळाला. जन्म व बालपण छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर संस्थानात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. बालपणी त्यांना दत्तक घेऊन कोल्हापूरच्या…

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांची जीवनकथा शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता आणि न्याय यांचा एक उत्तम आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाईने त्यांच्यावर धार्मिक, नैतिक आणि शौर्याचे संस्कार केले. लहानपणापासूनच शिवाजींना स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पडत होते. त्यांनी मावळ्यांना एकत्र करून स्वतःचे…

पुढे वाचा

बेडूक आणि बैलाची गोष्ट 

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

मुंगी आणि हत्ती

एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधीकधी त्रासही देत असे. मुंगी, दुसरीकडे, खूपच छोटी आणि दुर्बल होती, पण ती मेहनती होती…

पुढे वाचा

दांडी यात्रा: मिठाचा सत्याग्रह

१९३० सालचा मार्च महिना होता. भारतावर ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व होते, आणि सामान्य लोकांवर अन्यायकारक कर लादले जात होते. त्यापैकी एक कर होता मिठाच्या उत्पादनावरचा कर, ज्यामुळे भारतीयांना स्वतःच्या देशात मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता. मीठ, जे प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक होते, त्यासाठीही ब्रिटिशांना कर भरावा लागत होता. याला आव्हान देण्यासाठी महात्मा गांधींनी एक शांततामय आंदोलन करण्याचा…

पुढे वाचा

माझा देवच मला वाचवेल

एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.  एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले….

पुढे वाचा

गर्विष्ठ दिवा

एका माणसाच्या घरी एक खुप सुंदर दिवा होता. अगदी सुबक, रेखीव नक्षीकाम केलेला, चमकदार.  तो माणुस त्या दिव्याला नेहमी लख्ख पुसुन ठेवायचा. रोज तेल घालुन नवी वात लावायचा. त्यामुळे त्या दिव्याचा पूर्ण खोलीत छान प्रकाश पसरायचा. त्या माणसाकडे येणारे लोक नेहमी त्या दिव्याचं कौतुक करायचे.  “किती सुंदर दिवा आहे” “काय छान प्रकाश पडलाय”  “या दिव्यामुळे घर…

पुढे वाचा

चवदार तळ्याचा रणसंग्राम: समतेसाठीचा लढा

महाडच्या शांत गावात चवदार तळे हे पाण्याचा मुख्य स्रोत होते. जरी ते सार्वजनिक तलाव होते, तरीही अस्पृश्य समाजाला तळ्यातून पाणी घेण्यास बंदी होती. उच्चवर्णीयांच्या व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठीही अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एका शांत परंतु दृढनिश्चयी नेत्याने, या अन्यायाला आव्हान देण्याचा निर्धार केला. बाबासाहेबांनी महाड येथे एका मोठ्या सभेचे…

पुढे वाचा

कृती आधी उपदेश नंतर

एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.  पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला. एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने…

पुढे वाचा

खारीचा वाटा

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती.  ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पुल/ ब्रिज) बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर…

पुढे वाचा