विश्वविक्रमी गुकेश
१८ वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख- कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे? माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान…