गंपूची शाळा
एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…
मुलीचं उत्तर – ‘मी करू शकते’
एका लहानशा खेड्यात राहणारी सानिका ही गरीब घरातली मुलगी होती. तिचं स्वप्न होतं – शिक्षण घेऊन डॉक्टर होणं. पण गावातल्या लोकांना वाटायचं, “मुलींनी काय डॉक्टर व्हायचं? लग्न करायचं आणि घर चालवायचं.” शाळेत जाताना तिच्या कानावर अनेकदा हेच शब्द पडत: “तुझ्या घरची परिस्थिती बघ… मुलगी आहेस… डॉक्टर बनणं काही सोपं नाही!” पण सानिकाच्या डोळ्यांत विश्वास होता…
संत सावता माळी
संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते. परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत, एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहचवले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातुन…
कबुतर आणि मुंगी ची गोष्ट
एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…
कष्टाचे फळ
एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते…
कबुतर आणि मुंगी
एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…
शब्दांचे ओझे
गावात दोन मित्र राहत होते – माधव आणि केशव. माधव शांत स्वभावाचा होता आणि विचारपूर्वक बोलणे त्याला आवडायचे. केशव मात्र खूप बडबड्या होता. त्याला सतत काहीतरी बोलायची सवय होती, विचार न करता तो काहीही बोलून जायचा. एक दिवस गावात मोठी पंचायत बसली होती. गावातील एका जमिनीच्या मालकीवरून वाद होता आणि सगळे गावकरी आपले मत मांडत…
“शेवग्याच्या झाडाखाली”
राघोबा काका हे गावातले एक वृद्ध पण मनाने तरुण शेतकरी होते. त्यांचं वय सत्तरच्या वर होतं, पण रोज पहाटे चार वाजता ते उठून शेतात जायचे. तेथील लोक त्यांना “वेडे काका” म्हणायचे, कारण त्यांच्या वयात इतर लोक विश्रांती घेत होते, पण राघोबा काका मात्र दररोज नवनवीन झाडं लावत होते. त्यांचा विशेष भर होता शेवग्याच्या झाडांवर. गावकरी…
अष्टावधानी विवेकानंद
१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट- १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या…