Lion

सिंहाच्या वेशात गाढव

एकदा एका गाढवाला सिंहाची कातडी सापडली. गाढवाने ती पांघरली आणि थाटात फिरू लागलं. इतर प्राणी त्याला सिंह समजुन तो दिसता क्षणी घाबरून दूर पळु लागले. गाढवाला मजा यायला लागली. आजवर कोणीही त्याला घाबरून पळालं नव्हतं. गाढव जंगलात सगळीकडे फिरून प्राण्यांना घाबरवु लागलं. फिरता फिरता गाढवाला एका कोपऱ्यात एक कोल्हा दिसला. गाढव त्याला घाबरवायला त्याच्या जवळ जाऊ लागलं. कोल्ह्याने सावध पवित्रा घेतला आणि सिंहाच्या…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा

टेनालीरामाची नवी गोष्ट : तांदळाची शक्कल

विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही यामुळे चिंतेत पडला. त्याने दरबारात मंत्र्यांना विचारलं, “या महागाईचं मूळ कारण काय आहे?” मंत्री आपापल्या कल्पना मांडू लागले – कुणी म्हणाले पाऊस कमी झाला म्हणून पीक घटलं, तर कुणी…

पुढे वाचा

निर्मळता

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ…

पुढे वाचा
Lion And Rabbit

मूर्ख सिंह आणि हुशार ससा

एकदा एक लोभी सिंह होता. हा सिंह प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला खूप घाबरत होता. एके दिवशी, त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज सिंहाकडे, त्याची शिकार म्हणून जाईल. सिंहाने ते मान्य केले. जेव्हा सशाची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या सश्याला पाठवायचे ठरवले. तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी सिंहाच्या…

पुढे वाचा

अष्टावधानी विवेकानंद

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट- १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या…

पुढे वाचा

अहंकारी राजाला धडा 

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

लहानसा मोरू आणि त्याची हुशारी

एका गावात मोरू नावाचा एक लहानसा मुलगा राहत होता. तो अतिशय हुशार आणि चपळ होता. मोरूला नवीन गोष्टी शिकायची खूप आवड होती. तो नेहमी आपल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकायचा आणि त्यातून काहीतरी शिकायचा. मोरूची गोष्ट एकदा गावात मोठ्या जंगलाजवळून एक व्यापारी जात होता. त्याच्याकडे खूप साऱ्या वस्तू होत्या, ज्या तो बाजारात विकायला नेत होता. तो रस्त्याने…

पुढे वाचा

कृती आधी उपदेश नंतर

एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.  पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला. एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने…

पुढे वाचा

चांद्रयान-३’चा अभिमान

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!   ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ…

पुढे वाचा