घोडा आणि गोगलगाय

एक होता घोडा, तो खूप घमंडी होता. त्याला एक गोगलगाय दिसली.तिला हळू हळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली. “अगं गोगलगायी। चल शर्यत लावायची का?” त्याने विचारले.
गोगलगायीला घोड्‌याचा राग आला.

“बरं, चालेल. रविवारी शर्यल लावूा” ती म्हणाली.
गोगलगाय घरी गेली. आणि तिने इतर सर्व गोगलगायींना एकत्र जमवले. त्यांना शर्यतीब‌द्दल सांगितले. सर्वानी मिळून घोड्‌याला अ‌द्दल घडवायची योजना आखली.

रविवारी सर्व गोगलगायी अगदी लवकर घराबाहेर पडल्या.

शर्यतीच्या सुरुवातीच्या जागेपासून शर्यत संपणार होती तिथपर्यंत थोड्या थोड्या अंतरावर गोगलगायी एक एक करून लपून राहिल्याशर्यत सुरु झाली. घोडा थोडा वेळ पळाला आणि त्याने समोर पहिले. समोर गोगलगाया घोड्‌याने आपला वेग वाढवला. तरी समोर गोगलगाय ! घोडा अजून अजून जोरात धावू लागला.
कितीही जोरात धावायचा प्रयत्न केला तरीही गोगलगाय घोड्याच्या पुढेच होती।

दमून भागून शेवटी घोड्‌याने हार मानली.

“मी हरलो!” तो निमूटपणे म्हणाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *