पंचतंत्र
कोल्हा आणि गरुड
एकदा एका गरुडाने कोल्ह्याच्या पिल्लाला पळवले. गरुडाच्या पिल्लांना खायला म्हणुन त्याने असे केले होते. कोल्ह्याने हे बघताच कुठुन तरी जळती मशाल आणली आणि गरुडाला त्याचं घरटं असलेलं झाड जाळून टाकण्याची धमकी दिली. आता आपली पिल्ले कोल्ह्यापासून सुरक्षित नाहीत हे गरुडाच्या लक्षात आले. त्याने कोल्ह्याच्या पिल्लाला परत केले.
एकीचे बळ
एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते. तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं,…
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी
एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसणार? हि कोंबडी सोन्याचं अंडं देते म्हणजे हिच्या पोटात बरंच सोनं असेल. आपण तिला मारून ते सगळं सोनं काढुन घेऊ.” …
शेतकरी आणि त्याची मुलं
एका गावात एक शेतकरी राहत होता. तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता. त्याला आपल्या मुलांची काळजी होती कारण ते फार आळशी होते. मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्यांना सांगितले कि “पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे. त्यामुळे आपलं शेत अजिबात विकु नका.”मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरु केले. शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे…
कोल्हा आणि करकोचा
एकदा कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. खरं तर कोल्ह्याचा करकोच्याची चेष्टा करायचा करण्याचा उद्देश होता. करकोचा एक पक्षी असतो. करकोच्याची चोच फार लांब असते. करकोचा कोल्ह्याच्या घरी आला. कोल्ह्याने जाणुनबुजुन खीर केली आणि ती उथळ भांड्यात वाढली. करकोच्याला आपल्या चोचीने त्या उथळ भांड्यातुन खाता आले नाही. कोल्ह्याने त्याची मजा बघत आपली खीर संपवली. मग “अरे तुला आज विशेष भूक नाहीये…
फटक्यांचे बक्षीस
महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता. महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले. बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …