वाघ आणि ससा

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरले होते. ते म्हणू लागले, “जर वाघ अशाच प्रकारे दररोज कोणालातरी खाणार असेल, तर लवकरच संपूर्ण जंगलातील…

पुढे वाचा

सच्चा राजा

खूप वर्षांपूर्वी एका मोठ्या राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं राजा धर्मसेन. तो न्यायप्रिय, दयाळू आणि प्रजेसाठी झटणारा राजा होता. त्याला एक मोठी चिंता होती — आपल्या राज्याचा पुढचा वारस कोण असावा? राजाचा मुलगा नव्हता. त्यामुळे त्याने ठरवलं की संपूर्ण राज्यात स्पर्धा घेऊन, योग्य असा प्रामाणिक आणि बुद्धिमान वारस निवडायचा. ही बातमी…

पुढे वाचा

प्रामाणिक रघूची भेट

एक होता रघू. तो एका लहानशा खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते आणि रघूला लहानपणापासून मेहनतीची व प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली होती. तो रोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आईला घरकामात मदत करायचा, आणि वडिलांसोबत शेतातही जात असे. रघूचा स्वभाव फारच सरळ आणि सच्चा होता. त्याला खोटं बोलायला अजिबात आवडत नसे. मित्रांमध्येही तो नेहमी इमानेइतबारे…

पुढे वाचा

सत्याची ताकद

एका गावात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन खूपच साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा होता. तो नेहमी आई-वडिलांचं ऐकायचा, शाळेत नीट अभ्यास करायचा आणि कोणी खोटं बोललं की लगेच म्हणायचा, “सत्य बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे.” पण गावातले इतर काही मुले त्याची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं की खोटं बोलून, थोडं फसवून लवकर फायदा…

पुढे वाचा

साप आणि कावळे

एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यांच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली. परंतु कावळ्यांना हे माहीत नव्हतं की, लवकरच त्यांच्या सुखी जीवनामध्ये एक खूप मोठे संकट येणार आहे. त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक मोठा साप राहत होता. तो…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा

पूतना वध – कृष्णाची पहिली राक्षसीवध लीला

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला पण त्याला वाचवण्यासाठी वासुदेवांनी त्याला गोकुळात नंद-यशोदा यांच्या घरी आणलं.कंसाला हे समजल्यावर त्याने विविध राक्षस आणि राक्षसींना कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं. त्यातील पहिली होती – पूतना. पूतना ही एक राक्षसी होती जिने अनेक लहान बाळांना विषारी दुधाने मारले होते. ती वेगवेगळ्या गावांमध्ये स्त्री रूप धारण करून जात असे आणि बाळांना…

पुढे वाचा

सोनपावलांची परी

खूप वर्षांपूर्वी, एका हिरव्या डोंगराच्या पायथ्याशी “चिंकी” नावाची एक गोड मुलगी तिच्या आजीबरोबर राहत होती. चिंकी खूपच उत्साही आणि जिज्ञासू होती. तिला रोज नवीन काहीतरी शिकायला आवडायचं. एके दिवशी, चिंकी जंगलात फुलं वेचायला गेली. फुलं वेचता वेचता ती थोडी दूर गेली आणि वाट चुकली. चिंकी थोडी घाबरली, पण तिच्या आजीने नेहमी सांगितलेलं आठवलं – “कधी…

पुढे वाचा

“शून्यातून शिखराकडे”

राजेश गावातल्या एका लहानशा कुटुंबात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात फार काही नव्हतं—ना पैशाचं सुख, ना मोठं घर, ना शाळेसाठी महागडं साहित्य. पण एक गोष्ट होती—स्वप्न. राजेशच्या डोळ्यात शिक्षणाचं, यशाचं आणि कष्टाने आयुष्य घडवण्याचं स्वप्न होतं. शाळा गावीच होती. दररोज चार किलोमीटर चालत तो शाळेत जात असे. त्याच्याकडे वह्या कमी, पण चिकाटी प्रचंड होती. शाळेत तो…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा