prachi

Manjar

दृष्ट मांजर

जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती.पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते. मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत…

पुढे वाचा
Gadhav ani kutra

गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते. मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस…

पुढे वाचा
Hushar Beduk

हुशार बेडूक

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात…

पुढे वाचा
Hushar kolha

हुशार कोल्हा आणि धूर्त कावळा

एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते.तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन…

पुढे वाचा
Aambe

स्वस्तातले आंबे

लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला. संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता. त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली. म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे…

पुढे वाचा
Geetarahasya

गीतारहस्य

टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती. टिळकांच्या वेळेस…

पुढे वाचा
Sant

दोन संतांची तीर्थयात्रा

ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत….

पुढे वाचा
Udnari bhint

उडणारी भिंत

नेवाश्यात ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोहोचले. आळंदीतुन नेहमी अपमान सहन करून, वाळीत टाकलेले आयुष्य जगून ते बाहेर पडले होते. आता परत आले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली होती. त्यांचं आता उत्साहात स्वागत झालं. ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क चौदाशे वर्षांचे होते. लहानपणापासुन तपसाधना…

पुढे वाचा
kalidas

कविकुलगुरू कालिदास

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे…

पुढे वाचा
Chatur raja

चतुर राजा

एक राजा दुसऱ्या राजा वरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो .युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोष मध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो .युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. या राजाने पाहला नसल्याने तुला राजकुमार ओळखू येत नाही.दुसऱ्या दिवशी राजकुमार आपले धन परत आणण्यासाठी…

पुढे वाचा