“शाळेची पायरी”

कोकणातल्या एका लहानशा गावात लताबाई नावाची वृद्ध महिला राहत होती. वयाच्या साठीनंतरही ती प्रत्येक सकाळी आपल्या घरासमोरील अंगण झाडून ठेवायची, भांडी घासायची, आणि शाळेच्या घंटा वाजेपर्यंत वाट बघायची. का, हे कोणालाच समजायचं नाही. लताबाईचं शिक्षण लहानपणीच बंद झालं होतं. वयाच्या दहाव्या वर्षीच तिला घरकामासाठी ठेवण्यात आलं आणि पुढे लग्न झालं. पण शिक्षणाविषयीचं तिचं आकर्षण काही…

पुढे वाचा

हत्ती आणि चार आंधळे

एका गावात चार आंधळे राहत होते. ते सर्वजण बुद्धिमान होते पण त्यांना त्यांच्या अंधत्वामुळे जगाच्या अनेक गोष्टी समजत नव्हत्या. ते नेहमी एकमेकांशी चर्चा करत असत की “हत्ती म्हणजे काय दिसतो असेल?” गावात कोणीही हत्ती पाहिलेला नव्हता, आणि त्यामुळे हत्ती म्हणजे काय, हे समजून घेणं त्यांचं स्वप्न झालं होतं. एक दिवस गावात एक महूत हत्ती घेऊन…

पुढे वाचा

एका डोळ्याची आई

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो….

पुढे वाचा

श्री गणेश जन्माची कहाणी

भगवान शिव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहायचे आणि ते त्यांचे निवासस्थान होते. बहुतेक वेळा, शिव इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बाहेर असायचे तर पार्वती पर्वतावर एकटी असायची.एके दिवशी, अशाच एका प्रसंगी, पार्वतीला स्नान करायला जावे लागले आणि तिला कोणीही त्रास देऊ इच्छित नव्हते. पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात जीवन फुंकले. तिने बाळाला…

पुढे वाचा

यशोदेचा उखळाला बांधलेला कृष्ण

गोकुळामध्ये कृष्णाच्या खोड्यांमुळे संपूर्ण गाव हलवून जात असे. तो रोज काही ना काही नवीन शरारत करत असे — कधी गायींच्या शेपटी ओढायचा, कधी गवळणींच्या माठावर दगड मारून माखन सांडायचा, तर कधी घरातले लोणी चोरून आपल्या मित्रांसोबत झाडावर बसून खायचा. यशोदा माई त्याला आईसारखं प्रेम करत असे, पण त्याच्या खोड्यांमुळे ती कधी कधी रागावत असे. एके…

पुढे वाचा

मुलीचं उत्तर – ‘मी करू शकते’

एका लहानशा खेड्यात राहणारी सानिका ही गरीब घरातली मुलगी होती. तिचं स्वप्न होतं – शिक्षण घेऊन डॉक्टर होणं. पण गावातल्या लोकांना वाटायचं, “मुलींनी काय डॉक्टर व्हायचं? लग्न करायचं आणि घर चालवायचं.” शाळेत जाताना तिच्या कानावर अनेकदा हेच शब्द पडत: “तुझ्या घरची परिस्थिती बघ… मुलगी आहेस… डॉक्टर बनणं काही सोपं नाही!” पण सानिकाच्या डोळ्यांत विश्वास होता…

पुढे वाचा

ध्रुव एक तारा

प्राचीन काळी उत्तर पदेशात उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याच्या दोन राण्या होत्या — सुरूची आणि सुनिती. सुरूची ही राजाची लाडकी राणी होती, त्यामुळे राजा तिच्यावर अधिक प्रेम करायचा. सुनिती ही शांत, सुशील पण दुर्लक्षित राणी होती. तिच्या पोटी ध्रुव नावाचा एक मुलगा झाला होता. एक दिवस ध्रुव बाळ राजवाड्यात खेळत असताना त्याला आपल्या वडिलांच्या…

पुढे वाचा

लाकूडतोड्याची गोष्ट

एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी तो लाकडं कापायला जातो. तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असतं. लाकूड कापता-कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते. तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील…

पुढे वाचा

“विजेचा दिवा”

बाबुराव हे एका दुर्गम डोंगराळ भागात राहणारे साधे शेतकरी होते. त्यांच्या गावात अजूनही वीज पोहोचलेली नव्हती. रात्री अंधारात कंदीलाच्या प्रकाशावर मुलं अभ्यास करायची, आई स्वयंपाक करायची, आणि वृद्ध लोक वेळ मारून नेत असत. सरकारी अधिकारी फक्त आश्वासनं देत गेले. गावकऱ्यांनी आशा सोडली होती. पण बाबुराव मात्र काही वेगळंच स्वप्न पाहत होते – “आपल्या गावात वीज…

पुढे वाचा

झाडावरची फुलं

एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मारायला आणि आराम करायला येत. झाडावरची फुलं इतकी सुंदर आणि रंगीत होती की, त्यांचा सुगंध दूरवर पसरत असे. गावात एक छोटा मुलगा होता, त्याचे नाव चिंटू. चिंटू खूप उत्सुक आणि…

पुढे वाचा