सोन्याची अंडी देणारी कोंबडी

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री…

पुढे वाचा

साने गुरुजी

प्रारंभिक जीवन  साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1999 रोजी ब्रिटिश भारतातील बॉम्बे राज्यातील दापोली शहराजवळील पालगड गावात. सदाशिवराव आणि यशोदाबाई साने यांच्या एका ब्राह्मण कुटुंबात (महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात ) झाला . तो त्यांचा तिसरा मुलगा आणि दुसरा मुलगा होता. त्यांचे वडील, सदाशिवराव हे परंपरेने खोत म्हणून ओळखले जाणारे महसूल कलेक्टर होते , त्यांनी सरकारच्या वतीने गावातील पिकांचे मूल्यांकन आणि संकलन केले होते आणि त्यांना त्यांच्या संग्रहातील पंचवीस…

पुढे वाचा

सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव

कारगिल युद्धाच्या काळात सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांना ‘१८ द  ग्रेनेडियर्स’ या सैन्यपथकातून द्रास भागात आणले गेले. पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी कब्जा मिळवलेल्या कारगिलच्या उंच पर्वतरांगांमधील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या टायगर हिल्सवर कब्जा मिळवण्याचा आदेश १८ ग्रेनेडियर्सच्या कमांडो पथकाला मिळाला. मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव हे याच क्षणाची वाट पाहत होते. टायगर हिल्सवर हल्ला करण्याचे नियोजन समजून घेऊन त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करीत ते  १९९९ साली जुलैच्या पहिल्या आठवड्यात टायगर हिलवर चढाई करायला सज्ज झाले.कारगिल पर्वतांच्या उंच उंच रांगा, सातत्याने पडणारा बर्फ, निर्मनुष्य परिसर, दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरलेली नीरव शांतता आणि कमालीच्या थंड वातावरणात अतिशय खडतर पर्वत, शस्त्रांसह चढायचे हे मोठे आव्हानच होते. खालून टायगर हिल्सवर बोफोर्स गनमधून मारा सुरू होता. मेजर सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांचे कमांडो पथक ४ जुलैच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत टायगर हिल्सच्या दिशेने निघाले. वाटेत ‘टोलोलिंग’ हे पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी बळकावलेले भारतीय ठाणे लागले. ते कमांडोंच्या प्लॅटूनने सहजतेने जिंकले आणि टायगर हिल्स जिंकण्यासाठी आगेकूच सुरू केली. दोन दिवस अखंड पायपीट केल्यानंतर ते टायगर हिल्सच्या पायथ्याशी पोहोचले.  टायगर हिल्सची चढण अतिशय उभी होती. मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र मनाचा निग्रह करीत ते पुढे सरकत राहिले. पर्वताच्या साधारण मध्यभागी आले असताना मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी सोबत आणलेले मोठे दोर तिथल्या मोठ्या दगडांना बांधून खाली सोडले. हे दोर पकडून पर्वतावर येणे भारतीय सैनिकांना सोयीचे जाणार होते.यानुसार कमांडो प्लॅटूनचे काही सैनिक दोर धरून चढूही लागले. मात्र याच काळात टायगर हिल्सच्या वरच्या पठारावर खंदकात लपलेल्या पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी मशीनगन आणि मॉर्टरचा जोरदार मारा सुरू केला. त्यामुळे या तुकडीचे कमांडर आणि दोन सैनिक मृत्युमुखी पडले. मात्र मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांचा निर्धार पक्का होता. आपल्या सोबत सैनिकांना प्रोत्साहन देत, “मी स्वतः पुढे जाऊन सारा बंदोबस्त करतो, पाठोपाठ तुम्ही या” असे सांगत ती उभी चढण पार केली. आणि पहाडाच्या पठारापासून सुमारे ६० फूट दूर असतानाच शत्रूंच्या गोळ्यांनी ते जखमी झाले. त्यांच्या खांदा व पायात तीन गोळ्या घुसल्या होत्या. मात्र जिद्दी मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव डगमगले नाहीत. उलट अधिक जिद्दीने आणि त्वेषाने त्यांनी सारी चढण पार केली. पठारावर येतातच खंडकातील मशीनगन बंद पाडणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ओळखले. खंदकावर हल्ला केला. हातातील हॅन्ड ग्रॅनाईट खंदकात फेकला. या स्फोटात खंदकातील चारही पाकिस्तानी घुसखोर सैनिक जागीच ठार झाले. त्यांच्या धडाडणाऱ्या मशीनगन्स बंद पडल्या. यामध्ये स्वतः मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादवही जखमी झाले. जखमांमधून रक्त वाहत असतानाही न थांबता त्या अतिथंड वातावरणात ते अंधारात सरपटत दुसऱ्या खंदकाकडे जात राहिले. अती रक्तस्त्रावामुळे त्यांना ग्लानी येत होती. मात्र हा शूर योद्धा पुढे सरकतच राहिला. टायगर हिल्सवरील दुसऱ्या खंदकातून मशीन फायरिंग करणाऱ्या चारही पाकिस्तानी घुसखोर सैनिकांवर ते तुटून पडले. त्यांच्यासोबतच्या दोन भारतीय कमांडोंनी अतिशय त्वेषाने खंदकातील पाकिस्तानी घुसखोर सैनिकांवर हल्ला केला. चारही जणांना भोसकून ठार केले.  तरुण वयात कमावलेली ताकद योगेंद्रसिंहांना फार उपयोगी पडली. आता खंदकातून मारा करणारी दुसरी मशीनगनही बंद पडली. त्यामुळे खालून वर येणाऱ्या कमांडो प्लॅटूनचा मार्ग निर्धोक बनला होता. मेजर सुभेदार योगेंद्रसिंहांसोबत असणारे त्यांचे दोन सहकारी त्यांना, माघारी फिरावे असा सल्ला देत होते. योगेंद्रसिंह यांनी तो साफ नाकारला. टायगर हिल्सवर तिरंगा फडकेपर्यंत विश्रांती नाही, हा निर्धार व्यक्त केला. तोपर्यंत त्यांच्या कमांडो प्लॅटूनचे उर्वरित जवान निर्धोकपणे पठारावर पोहोचले. त्यांनी साऱ्या पठारावर ठिकठिकाणी लपलेल्या पाकिस्तानी घुसखोर सैनिकांचा खात्मा करून टायगर हिल्सवर तिरंगा फडकवला. अतिरक्तस्त्रावामुळे ग्लानी आलेल्या मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी टायगर हिल्स मुक्त करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांना तब्बल १२ गोळ्या लागल्या होत्या. तिरंग्याकडे बघत असतानाच ते खाली कोसळले. त्यांच्या कमांडो प्लॅटूनने टायगर हिल्स जिंकल्यानंतर तातडीने बेस कॅम्पवर योगेंद्रसिंह यांना आणले. पुढे हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत भरती केले.लष्करातील डॉक्टरांनी मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करून शरीरात घुसलेल्या सर्व गोळ्या बाहेर काढल्या. त्यानंतर कित्येक महिने ते हॉस्पिटलमध्येच राहिले. टायगर हिल्ससारखे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण काबीज करताना मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या ३० जणांच्या कमांडो प्लॅटूनमधील नऊ कमांडोंना प्राण गमवावे लागले. या नऊजणांना वीरमरण आले. योगेंद्र सिंह यांचे शौर्य आणि नेतृत्व यामुळे टायगर हिलवर पुन्हा भारताचा कब्जा प्रस्थापित झाला. भारतीय लष्कराला व देशाच्या सीमेला असणारा फार मोठा धोका टळला.त्यांच्या अमाप शौर्य, धैर्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि प्राणाची बाजी लावण्याची वृत्ती यामुळे त्यांना परमवीर चक्र जाहीर झाले. परमवीर चक्र मिळाले तेव्हा सुभेदार मेजर मेजर योगेंद्र सिंह यादव हे अवघे १९ वर्षांचे होते.१० मे १९८० रोजी उत्तर प्रदेशातील बुलंद शहराजवळील औरंगाबाद अहिर इथे जन्मलेल्या योगेंद्रसिंह यादव यांचे वडील करणसिंह यादव हेही भारतीय सैन्यात कुमाऊँ रेजिमेंटमध्ये होते. १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. घरातील लष्करी वातावरणाचा योगेंद्रसिंहांवर लहानपणापासूनच प्रभाव पडला होता. युद्धाच्या शौर्यकथा ऐकताना त्यांचे सैन्य-भरतीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेले. सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय लष्कर सेनेत प्रवेश घेतला.सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांची अनेक मनोगते यूट्यूब चॅनल्सवर उपलब्ध आहेत. सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांचे कार्यकर्तृत्व भारतातील तरुणांचे प्रेरणास्थान बनावे.

पुढे वाचा

गुणी आंबा

आंबा पिकितो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ ..परीक्षा आटोपल्या, निकाल लागलेत आणि बच्चेकंपनी पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करणार आहे. पण त्या अगोदर हातात असलेल्या लाडक्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटून ताजंतवानं व्हायचं आहे. मगच पुढच्या तयारीचा विचार, होय ना ? अर्थातच. काय मग. गावाला जायचा बेत आहे की घरीच पाहुणेमंडळी जमणार आहेत ?  गावाला…

पुढे वाचा

माझा विघ्नहर्ता

पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आठवडाभर आधी त्याने माता पार्वतीच्या डोक्याशी भुणभुण चालू केली. “चल ना गं आई, जरा फिरून येऊ. किती कंटाळा आलाय दररोज तेच तेच खेळ खेळून…” सुरुवातीला मातेने फार लक्ष दिले नाही, पण…

पुढे वाचा

छत्रपती संभाजी महाराज

संभाजी महाराजांचा जन्म आणि शिक्षण  छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणी संभाजी महाराजांचे संगोपन त्यांच्या आजी दादी जिजाबाई यांनी केले. कारण संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी आई सईबाई गमावल्या होत्या. संभाजी महाराजांचे दुसरे नाव चावा. मराठी भाषेत छावा म्हणजे सिंहाचे बाळ. संभाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

मेजर मुकुंद वरदराजन

**परिचय** मेजर मुकुंद वरदराजन, सहसा धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते, हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी होते ज्यांनी कर्तव्याच्या ओळीत आपले बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, सामरिक कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची खोल भावना यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर वरदराजनची कहाणी संपूर्ण भारतातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन, कारकीर्द आणि अंतिम बलिदान हे…

पुढे वाचा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

 एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा