निळा राजा
एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र…