एकीचे बळ
एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते. तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं,…