बासरीवाला मुलगा आणि गावकरी

 फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा…

पुढे वाचा
kashta

कष्टाचे फळ 

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे.त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते…

पुढे वाचा

गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक हत्ती राहायचा.त्याला आपल्या शरीरावर आणि शक्तीवर खूप गर्व होता.वाटेत कोणताही प्राणी भेटला तर त्याला त्रास द्यायचा आणि घाबरवायचा. एकदा तो रस्त्याने चालला होता. रस्त्यात एका झाडाखाली त्याला एक पोपट बसलेला दिसला.व त्याला म्हणाला मला नमस्कार कर. पोपट नाही म्हणाला. हत्तीला राग आला व त्याने ते झाड उपटून टाकले….

पुढे वाचा

भूत बंगला

रमेश आणि सुरेश, दोन मित्र, सुट्ट्यांमध्ये एका लहान गावी त्यांच्या आजोबांच्या घरी आले होते. गाव शांत आणि सुंदर होते, पण गावाच्या एका टोकाला एक जुना, ओसाड बंगला होता. गावातील लोक त्या बंगल्याला ‘भूत बंगला’ म्हणायचे आणि सूर्यास्तानंतर कोणीही त्याच्या आसपास फिरकायचे नाही. रमेशला भूता-खेतांवर विश्वास नव्हता, तो नेहमी या गोष्टींना थोतांड म्हणायचा. पण सुरेश मात्र…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा
Mungus

एकनिष्ठ मुंगूस

एका शेतकरी जोडप्याकडे पाळीव मुंगूस होता. एके दिवशी, शेतकरी आणि त्याच्या पत्नीला कामासाठी तातडीने घराबाहेर जावे लागले, आणि म्हणून त्यांनी मुंगूस आपल्या बाळाजवळ सोडले आणि त्याच्याकडून आश्वासन घेतले कि तो बाळाचे चांगले रक्षण करेल. शेतकरी जोडपे बाहेर गेल्यावर एक साप हळूच घरात शिरला आणि बाळावर हल्ला करण्यासाठी पाळण्याजवळ गेला. हुशार मुंगूस बाळाचे रक्षण करण्यासाठी सापाशी…

पुढे वाचा

बकासुराचा वध

पांडव वनवासात असताना ते काही काळ एक्झात नगरात (एकचक्रा नगरीत) वास्तव्यास होते. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने पाहिलं की गावात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. याचं कारण विचारल्यावर, त्यांना समजलं की गावात “बकासुर” नावाचा एक राक्षस आहे. बकासुर फारच बलाढ्य होता. तो गावात येऊन अन्न मागायचा, आणि जो अन्न घेऊन जाईल, त्यालाही खाऊन टाकायचा. म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा

सर्वात मोठा अपराधी कोण?

एकदा अकबर बादशहा आपल्या दरबारात बसला होता. त्याच्या मनात एक विचित्र पण महत्त्वाचा प्रश्न आला. त्याने सर्व दरबारी आणि आपल्या प्रिय मंत्री बिरबलला विचारले – “या जगातला सर्वात मोठा अपराधी कोण?” दरबारात उपस्थित अनेक मंत्र्यांनी आपापली उत्तरं दिली. कोणी म्हणालं – खून करणारा, कोणी म्हणालं – देशद्रोही, कोणी तर चोर-दरोडेखोर असं म्हणालं. पण बादशहाला कोणाचंही…

पुढे वाचा

स्मार्टफोनची मैत्री

विशाल आणि अथर्व एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकणारे दोन मित्र होते. पण त्यांच्यात खूप फरक होता. विशाल गरीब कुटुंबातील होता आणि त्याचे वडील एका लहानशा दुकानात काम करत होते. त्याच्याकडे साधा मोबाईल फोन होता, फक्त बोलण्यासाठी आणि मेसेज करण्यासाठी. अथर्व एका मोठ्या आणि श्रीमंत कुटुंबातील होता. त्याच्याकडे महागडा स्मार्टफोन होता, ज्यात अनेक आधुनिक फीचर्स होते….

पुढे वाचा