दोन संतांची तीर्थयात्रा
ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत….