सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले…

पुढे वाचा

खोडकर मेंढपाळ

एका खेड्यात एक छोटा मेंढपाळ राहत होता. त्याला मजा करायला खूप आवडायचे. एके दिवशी त्याला गावकऱ्यांना फसवायची कल्पना सुचली. तो ओरडला, “सिंह आला! सिंह आला! माझ्या मेंढ्या खाण्यासाठी आला आहे!” गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धावत आले. पण त्यांनी पाहिले की तिथे सिंह नव्हता. मेंढपाळ मोठ्याने हसत म्हणाला, “मी फक्त मजा करत होतो!” गावकऱ्यांना…

पुढे वाचा

सोन्याचं अंडं देणारी कोंबडी

एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला.  एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसणार? हि कोंबडी सोन्याचं अंडं देते म्हणजे हिच्या पोटात बरंच सोनं असेल. आपण तिला मारून ते सगळं सोनं काढुन घेऊ.” …

पुढे वाचा

कावळ्याची युक्ती

एका जंगलात एक कावळा राहत होता. त्याला खूप तहान लागली होती, पण त्याला कुठेही पाणी दिसत नव्हते. तो उडत उडत एका गावाला पोहोचला. तिथे त्याला एक मातीचं मोठं भांडं दिसलं. कावळा त्या भांड्याजवळ गेला आणि त्याने पाहिलं, तर त्यात थोडंसं पाणी होतं, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळा निराश झाला, पण त्याने हार मानली…

पुढे वाचा
Chatur raja

चतुर राजा

एक राजा दुसऱ्या राजा वरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो .युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोष मध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो .युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. या राजाने पाहला नसल्याने तुला राजकुमार ओळखू येत नाही.दुसऱ्या दिवशी राजकुमार आपले धन परत आणण्यासाठी…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर…

पुढे वाचा
Gadhav ani kutra

गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते. मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस…

पुढे वाचा
srtghr

चोर कि दाढी मे तिनका

एकदा अकबर आणि बिरबल दोघे मिळुन शहरात फेरफटका मारत होते. अचानक त्यांना जवळुन गलका ऐकु यायला लागला. ते आवाजाच्या दिशेने गेले.  तो आवाज एका मोठ्या बंगल्यातुन येत होता. त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली. घरमालकाने त्यांना पाहुन आत बोलावले आणि सांगितले “हुजूर माझी एक गाय बेपत्ता आहे. कोणी तरी तिला चोरून घेऊन गेलं आहे. हुजूर कृपया…

पुढे वाचा