एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले दिसून येते. जादूची कोंबडी आहे ही तिच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडी देते.
काही आठवडे चालू राहिले व तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला.शेतकऱ्याच्या बायको अत्यंत लोबी होती ती एक दिवस घरात शेतकरी नसताना कल्पना सुचते की आपण हिला कापून पोटातील सर्व अंडे काढले तर खूप मोठे श्रीमंत ठरू. ती त्या कोंबडीला कापते परंतु तिचा पोटामध्ये काहीच निघत नाही व कोंबडी मरण पावते.
तात्पर्य :-अति तिथे माती