मुलांच्या कथा
कोल्ह्याची फजिती
एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…
बेडूक आणि बैल
फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…
अहंकारी राजाला धडा
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक…
मुंगी व कोशातला किडा
एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच…
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…
कपटी साप आणि लाकुडतोड्या
हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…
सोनेरी शिंगाचे हरिण
एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग…
एका पेन्सिलीची गोष्ट
राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला “माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही.” आजीने समजावले,” तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे,…
सुयांचे झाड
एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,”महोदय, कृपा…
निळा राजा
एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र…