मुलांच्या कथा
गाढवाला मिळाली शिक्षा
एका गावात व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे. एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि मग…
कावळा आणि चिमणी
एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं आकाशात…
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती. ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…
टोपीवाला आणि माकडे
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…
नागपंचमीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली. पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे. नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल. तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेषभगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा…
सिंड्रेला
एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी
एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसणार? हि कोंबडी सोन्याचं अंडं देते म्हणजे हिच्या पोटात बरंच सोनं असेल. आपण तिला मारून ते सगळं सोनं काढुन घेऊ.” …
अकबराचा वाढदिवस
अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता. अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा…
चोराची काठी
एकदा स्वतः बादशहा अकबराच्या महालातुन एक मूल्यवान रत्न चोरीला गेले. एका राजाच्या स्वतःच्या महालात पुरेशी सुरक्षा नसणे हि अतिशय गंभीर बाब होती. अकबर अतिशय क्रोधीत झाला. त्याने सर्व नोकरांना फैलावर घेतले पण काही फायदा झाला नाही. त्याने ताबडतोब बिरबलाला बोलावुन घेतले. बिरबलाने सर्व परिस्थिती समजुन घेतली. आणि तो कुठेतरी गेला आणि भरपुर काठ्या घेऊन आला. …
अकबराचे स्वप्न
एकदा बादशहा अकबराला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात त्याचे सर्व दात पडले, फक्त एकच शिल्लक राहिला. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न दरबारात विचारायचे ठरवले. हि गोष्ट दरबारात सांगितल्यावर, दरबारी लोकांच्या सांगण्यावरून अकबराने एका ज्योतिष्याला दरबारात बोलावुन घेतले. त्याला ते स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. ज्योतिष्याने स्वप्नावर विचार केला…