मुलांच्या कथा
कबुतर आणि मुंगी
एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…
संगतीचा परिणाम
एक व्यापारी पाळीव प्राणी आणि पक्षी विकत असे. त्याच्याकडे एकदा खुप हुशार पोपट विकायला होते. व्यापाऱ्याने ग्राहकांना आकर्षित करायला त्या पोपटांना काही लहान वाक्ये बोलायला शिकवली होती. ह्या वैशिष्ट्यामुळे ते पोपट लगेच विकले गेले. तो व्यापारी अधुन मधुन त्याने विकलेल्या प्राण्यांच्या घरी जात असे. त्यांची काळजी घेण्यात काही अडचण असेल तर मालकांना मार्गदर्शन करत असे. त्यांना…
दुध न पिणारी मांजर
एकदा राजधानीमध्ये उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. सर्वांच्या घरी भरपुर उंदीर झाले होते आणि ते अन्न धान्याची नासाडी करायचे, कपडे कुरतडुन ठेवायचे. सर्वांना खुप त्रास होत होता. नागरिकांचा त्रास दुर करण्यासाठी महाराजांनी सर्वांच्या घरी मांजर पुरवायचे ठरवले. आणि त्या मांजरीला सशक्त ठेवायला त्यांनी ज्यांच्या घरी दुधाची सोय नव्हती अशा लोकांना गायसुद्धा दिली. तेनालीरामन आपल्या घरी गाय आणि…
शिवराज्याभिषेकसोहळा
भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या विरुद्ध…
नेत्रदानाचीगोष्ट
काही जणांना दुर्दैवाने जन्मतः डोळे नसतात, किंवा काही जणांचे अपघाताने किंवा आणखी कोणत्या समस्येने डोळे निकामी होतात. असे लोकसुद्धा आपल्या मेहनतीने, चिकाटीने डोळस लोकांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत स्वाभिमानाने जगात असतात.पण त्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिसत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना त्रास होतो. आता हळूहळू अंध आणि अपंग व्यक्तींनासुद्धा वावरता…
वटपौर्णिमा
एके काळी मद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती. मालविका त्याची राणी होती. राजा राणीला अनेक वर्षे मुल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाची आराधना केली. सुर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने राजा राणीला अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि गुणवान मुलगी झाली. सूर्यदेवाचे एक नाव आहे सावित्र. सूर्यदेवाच्या कृपेने झालेल्या या कन्येचे नाव तिच्या आई वडिलांनी सूर्याच्याच…
गुरुपौर्णिमा
आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…
कुत्र्याचे प्रतिबिंब
एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…
गरज आणि उधळपट्टी
महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…
श्री गणपतीची कहाणी
निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यायचा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करून त्यांतील सहा देवाला, सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे. अल्पदान, महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे. त्यास…