मुलांच्या कथा
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला.द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा…
सिंड्रेला
एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले…
गाढव आणि टोळ
एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले.त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले. गाढव निराश झाला.त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं?टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही….
दोन बैल आणि सिंह
एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती.दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता.ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं. तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता.तो म्हणाला…
प्रामाणिक सार्थक – (Pramanik Sarthak)
सार्थक खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही कामा निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने सार्थकला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. सार्थक जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची संत्री ठेवली होती….
दोन मित्र आणि अस्वल – (Don Mitra Ani Aswal)
एका छोट्या गावात मुकेश आणि राकेश नावाचे दोन जिवलग लहानपणीचे मित्र रहात होते. मुकेश हा शरीराने बारीक व राकेश हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या मोठ्या गावात घोड्याची सवारी करायला जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’ वाटेत पुढे जाताना त्यांना एक…
पिची आणि पोपट (Pichi ani Popat)
एका मोठ्या झाडाच्या आश्रयाला एक छोटेसे गाव होते. या गावात पिची नावाचा गोड, लहानसा ससा रहात होता. पिचीला खेळायची आणि मित्र बनवण्याची खूप आवड होती. पण गावातील इतर सारे प्राणी त्याच्यापेक्षा खूप मोठे होते. त्यामुळे पिचीला त्यांच्याबरोबर खेळता येत नव्हते. एक दिवस, पिची झाडाच्या फांदीवर बसला होता. त्याला खूप वाईट वाटत होते. अचानक, वरून एक…
माकड आणि मगर
एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे आवडत होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि माकड…
गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड…
हुशार शेतकरी
एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….