Maha Lakshmi

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…

पुढे वाचा
vishnu

श्रीविष्णूची कहाणी

काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….

पुढे वाचा
Nag Panchami

नागपंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली. पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे. नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल. तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेषभगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा…

पुढे वाचा
Lokmany Tilak

शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )

लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटुन खाल्ल्या. टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. शेंगा काढल्या कि त्यांनी टरफले वाट्टेल तिथे टाकल्या. बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली.  मधली सुट्टी संपल्यावर…

पुढे वाचा
sddxqa

शिवाजींची सहनशीलता

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा