
घोड्याचा खरा मालक
एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले. बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. तो म्हणाला…