
महालक्ष्मीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…