sanchita kijbile

हसायचं कशासाठी?

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली. अशी काय जादू असते हसण्यात?  मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या…

पुढे वाचा

साधं, स्वच्छ माणूसपण

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. ‘महात्मा’ म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, ‘इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा

त्या होत्या म्हणून…

‘वयम्’ मित्रांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या…

पुढे वाचा

विश्वविक्रमी गुकेश

१८ वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख- कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे? माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान…

पुढे वाचा

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच…

पुढे वाचा

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच…

पुढे वाचा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता.  थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…

पुढे वाचा

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा

एक तरी ओवी अनुभवावी ।

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी…

पुढे वाचा