सोन्याचं अंडं देणारी कोंबडी
एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसणार? हि कोंबडी सोन्याचं अंडं देते म्हणजे हिच्या पोटात बरंच सोनं असेल. आपण तिला मारून ते सगळं सोनं काढुन घेऊ.” …