वाळूतील रेष
एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते. अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली. अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रेष काढली. मग तो दरबाऱ्यांना म्हणाला जो कोणी मी काढलेल्या रेषेला हात न लावता, काही न करता छोटी करून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन. सर्व दरबारी शक्कल लढवण्याचा प्रयत्न…