“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…”

नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?”
2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ दाखवले. ते पाहून तिला वाटलं, “हे तर मीही करू शकते!” तिला ना मोबाईल वापरायचा अनुभव होता, ना काही टेक्निकल ज्ञान. पण इच्छाशक्ती होती!
तीने जुन्या मोबाइलमध्ये ट्रायपॉडशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. कधी भांडे उलटायचं, कधी आवाज येणार नाही… पण ती थांबली नाही.
पहिल्या महिन्यात फक्त 50 सब्स्क्राईबर्स होते. पण हळूहळू तिच्या “घरगुती स्वाद” या चॅनेलवर लोकांनी भरपूर प्रेम दिलं. तिच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या लोणचं, मसाले, पिठं, आणि गोड पदार्थ लोकांना खूप आवडले.
आज तिच्या चॅनेलवर 50,000 पेक्षा अधिक सब्स्क्राईबर्स आहेत. अनेक महिला तिला विचारतात, “ताई, आम्हीही हे कसं सुरू करू?”
✅ या कथेतील शिकवण:
वय, परिस्थिती किंवा शिक्षण हे मर्यादा नाहीत – इच्छा असेल तर वाट सापडते.
डिजिटल जगात कोणताही छंद व्यवसायात रूपांतरित होऊ शकतो. प्रत्येक स्त्रीमध्ये एक ताकद असते – फक्त तिला संधी आणि साथ हवी असते