
तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा लढा
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे काम तानाजींवर सोपवले. १६७० साली मोगल सैन्याच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला (सिंहगड) परत मिळवणे शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कोंढाण्याला परत मिळवल्याशिवाय पुणे आणि आसपासचा प्रदेश स्वराज्याच्या नियंत्रणाखाली येणे शक्य…