चोर कि दाढी मे तिनका
एकदा अकबर आणि बिरबल दोघे मिळुन शहरात फेरफटका मारत होते. अचानक त्यांना जवळुन गलका ऐकु यायला लागला. ते आवाजाच्या दिशेने गेले. तो आवाज एका मोठ्या बंगल्यातुन येत होता. त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली. घरमालकाने त्यांना पाहुन आत बोलावले आणि सांगितले “हुजूर माझी एक गाय बेपत्ता आहे. कोणी तरी तिला चोरून घेऊन गेलं आहे. हुजूर कृपया…