शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )
लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटुन खाल्ल्या. टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. शेंगा काढल्या कि त्यांनी टरफले वाट्टेल तिथे टाकल्या. बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली. मधली सुट्टी संपल्यावर…