तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले.
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…