तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.
थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.
शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …