मराठी कथन तयार आहे · कृत्रिम आवाज · ऐकण्यासाठी ▶ दाबा.
४ चित्रं · एक छान गोष्ट
चित्रांतून वाचूया
१ / ४
मूळ गोष्टीवर आधारित छोटं चित्रपुस्तक. संपूर्ण मजकूर खाली वाचा.
भाग 1
पाण्याचा शोध
एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो पाणी शोधत इकडे तिकडे उडत होता.
भाग 2
अरेरे! पाणी खूप खाली!
त्याला एक सुरई दिसली. पण पाणी अगदी तळाशी होते. त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती.
भाग 3
सुचली एक युक्ती
कावळ्याने छोटे दगड आणले आणि सुरईत टाकले. पाणी हळूहळू वर येऊ लागले!
भाग 4
मेहनतीचं गोड फळ
आता पाणी चोचीपर्यंत आले. कावळ्याने आनंदाने पाणी प्यायले. शांतपणे विचार केला की उपाय सापडतो!
चिऊताईचा प्रश्न: दगड टाकल्यावर काय झालं?
पाणी वर आलं! दगडांनी सुरईत जागा घेतल्यामुळे पाण्याची पातळी वाढली. तुला आणखी कोणती युक्ती सुचते?
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एके दिवशी एका कावळ्याला खुप तहान लागली होती. पण त्याला खुप फिरून पण पाणी सापडत नव्हते. फिरत फिरत त्याला एक सुरई दिसली. उडत उडत तो त्या सुरईवर जाऊन पोहोचला. त्या सुरईमध्ये पाणी तर होते, पण अगदी तळाशी. त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईमध्ये जाऊन पाणी पिणे कावळ्याला शक्य नव्हते. आधीच तहानलेला तो, आणखीच निराश झाला. पण त्याला आजूबाजूला दगड पाहुन एक शक्कल सुचली. त्याने त्याच्या चोचीत छोटे मोठे दगड आणुन सुरईमध्ये टाकायला सुरवात केली. दगडांमुळे तळाचे पाणी हळूहळू वर येण्यास सुरुवात झाली. थोड्यावेळाने ते पाणी कावळ्याला पिता येईल इतके वर आले. इतक्या मेहनतीनंतर शेवटी कावळ्याने आनंदाने आपली तहान भागवली.
.
तात्पर्य
जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …