तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका सरोवरात तीन मासे होते, ते तिघेही खूप चांगले मित्र होते. पहिला मासा खूप हुशार होता, दुसऱ्याला अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे माहित होते आणि तिसरा अट्टल होता, त्याला बदल आवडत नसत. पहिल्या माशाने मच्छीमाऱ्यांचे संभाषण ऐकले. ते दुसऱ्या दिवशी परत येऊन तलावात मासेमारी करणार होते. धोक्याची जाणीव करून त्याने आपल्या मित्रांना तलावातून बाहेर जाण्याचा इशारा दिला. दुसरा मासा म्हणाला, "मी इथेच थांबेन आणि पकडले तर मार्ग काढेन." तिसरा मासा म्हणाला, “मला बाहेर जायचे नाही. मी इथेच राहीन, आणि जर मी पकडला गेलो तर जाऊदे.” पहिला मासा बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी मच्छीमार आला आणि त्याने इतर दोन मासे पकडले. दुसरा चतुराईने मेल्याचे नाटक करून पळून गेला. तिसऱ्या माशाने काहीही केले नाही आणि तो पकडला गेला आणि मेला.
बोध: बदल स्वीकारण्यास नेहमी तयार असले पाहिजे आणि त्यानुसार जुळवून घेतले पाहिजे. जेव्हा तुम्हाला धोका जाणवेल तेव्हा लगेच कारवाई करा.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…