तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एकदा सूर्यदेव आणि वायुदेव यांचा कोण जास्त शक्तिशाली आहे यावरून वाद सुरु झाला. त्यांनी एकमेकांना आव्हान देऊन पैज लावायचे ठरवले. पैजेची अट अशी होती कि त्यांना एक कोट घालुन निघालेला प्रवासी रस्त्यात दिसला. जो कोणी आपल्या शक्तीने त्या प्रवाशाला आपला कोट काढायला भाग पाडेल तो जास्त शक्तिशाली मानला जाईल असे ठरले. पहिली पाळी होती वायुदेवाची. त्यांनी त्या प्रवाशाभोवती सोसाट्याचा वारा वाहवायला सुरु केला. त्या प्रवाशाने कोट आणखी आवळुन धरला. वायुदेवाने प्रचंड जोरात वादळ सदृश परिस्थिती निर्माण केली. त्या प्रवाशाला थंडी वाजायला लागली त्याने कोटाची सगळी बटणे लावली, कॉलर वर केली अगदी अंग घट्ट मिटुन तो कुडकुडत बसला. वायुदेव थांबले आणि सूर्यदेवाची पाळी आली.
वारं सरलं आणि तो प्रवासी पुन्हा वाटेला लागला. ऊन पडलं. हळू हळु सूर्याने उष्णता आणि उन्हाची प्रखरता वाढवत नेली. प्रवाश्याला गर्मी व्हायला लागली. त्याने कोटाची बटणे उघडली. काही वेळातच तो घामेघुम झाला. त्याने कोट तर काढलाच पण गर्मी असह्य झाल्याने शर्टाची बटणे सुद्धा उघडली आणि एका झाडाच्या सावलीत जाऊन थांबला. सगळी कामे केवळ भयंकर जोर लावुन होत नसतात. सूर्यदेवाची पैजेत सरशी झाली.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …