तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादुन चालला होता. मूर्ती अतिशय सुंदर होती. रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता. मूर्तिकाराच्या अप्रतिम शिल्पाचे कौतुक करत आणि देवाकडे पाहुन भावुक होत लोक नतमस्तक होत होते. सगळे आदराने वाकुन नमस्कार करत होते. एवढे कौतुक आणि आदर पाहुन गाढवाला आनंद झाला. त्याला वाटले आज इतक्या दिवसांनी लोकांना त्याचे कौतूक वाटत आहे. तो ह्या सन्मानाचा मनमुराद आनंद घेऊ लागला. ह्या आनंदाच्या भरात त्याचा वेग कमी होऊ लागला. त्याला आजची वेळ पूर्ण साजरी करायची होती. त्याच्या मालकाने दोन तीनदा त्याला आवाज देऊन पुढे चालायला सांगितले. गाढवाची तिथुन निघण्याची इच्छाच होत नव्हती. त्याचं पाऊल पुढे पडत नव्हतं.
शेवटी गाढवाला मालकाचा रट्टा बसला. “अरे मुर्खां, लोक कशाला नमस्कार करत आहेत हे तरी समजुन घे. तुझ्यावरच्या मूर्तीला आदर दाखवत आहेत लोक. माणसाने गाढवाला वाकुन नमस्कार करावा एवढे वाईट दिवस नाही आले अजुन.”
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …