तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका गावात एक सुतार होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता. सुताराचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते त्याला त्रास देते. सुताराचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि सुताराला चावे घेऊ लागते.
सुतार मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा सुताराच्या डोक्यावर बसून त्याला चावू लागली. आता मात्र सुतार खूप चिडतो.
सुतार त्याच्या मुलाला बोलावतो आणि सांगतो. केशव बाळ, या मधमाशीला मार बर, मला खूप त्रास देत आहे. सुताराचा मुलगा वडिलांचे ऐकणारा असतो, पण तो खूप मूर्ख असतो.
वडिलांच्या डोक्यावर मागच्या बाजूला मधमाशी बसलेली असते. केशव एक जाडी, लांब लचक काठी घेतो व वडिलांच्या मागे जातो. सर्व ताकत एकवटून डोक्यावर बसलेल्या मधमाशीच्या अंगावर जोरदार काठीचा प्रहर करतो. मधमाशी तिथून उडून जाते आणि काठी सुताराच्या डोक्यात बसते. सुतार जखमी होतो. अशा मूर्ख मुलाचा प्रताप सुताराला भोगावा लागतो.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …