तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे.पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो .
चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही. एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दृष्ट माणसाला देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो .
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…