तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती.पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते. मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत होती. एक दिवस तिच्या डोक्यामध्ये एक दुष्ट कल्पना आली.मांजराने घारीला बोलवले. मांजर घारीला म्हणाली, ""हे बघ डुकरीण झाडांची मुळे उकरत आहेत. लवकरच हे झाड पडेल आणि डुकरीण तुझ्या पिल्लांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते . घार हे ऐकून खूपच घाबरली. नंतर मांजर डुकरीणीकडे गेली आणि तिला म्हणाली, ""तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा घार तुझ्या पिल्लांना खाऊन टाकणार आहे.
मी तिला तसे म्हणताना ऐकले आहे.' डुकरीण पण घाबरली. त्या दोघी घाबरून आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाहीत. एके दिवशी दोघी भुकेने मारून गेल्या. अशा प्रकारे पूर्ण झाडावर मांजर एकटी राहू लागली. मांजरीने त्या दोघींना आपापसात घाबरूनच मारून टाकले.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…