तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला. द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.
तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच पुढे निघाला.
एक माकड बाजूला झाडावर त्याची मजा बघत बसला होता. त्याने कोल्ह्याची मस्करी करायला विचारले “काय कोल्हेबुवा, कशी वाटली द्राक्षे?”
कोल्ह्याला आपली फजिती कबूल करावी वाटली नाही. त्याने उत्तर दिले “अतिशय आंबट. असली फालतु द्राक्षे कोण खातो? मी तर चाललो जरा चांगली शिकार शोधायला.”
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…