तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका जंगलात एका सिहांचे राज्य होते. एका दिवशी तो सिह मेला. त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली. माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे भाषण झाले. माकडाने कोल्ह्यापेक्षा खुप छान भाषण केले . सगळ्याचे मनोरंजन करून सगळयांना प्रभावित केले. प्राण्यानी एक मताने माकडाला निवडून दिले. माकड राजा झालेला बघुन कोल्ह्याचा जळफळाट झाला. कोल्ह्यने माकडाला धडा शिकवण्यचे ठरवले.
कोल्हा एक दिवस माकडाकडे जाउन म्हणाला, “महाराज, तुम्ही आता साध्यासुध्या झाडाच्या फांदीवर राहता, ते काही चांगले वाटत नाही.” “मी तुमच्या थाटाला शोभेल असे एक झाड शोधुन काढले आहे .एवढे मोठे झाड आहे. त्याची फळंसुद्धा छान आहेत. तुम्ही तिथे अगदी थाटात राहाल. चला माझ्यासोबत.” माकड आनंदात कोल्ह्यच्या मागे मागे निघाले. कोल्ह्याने चतुराईने त्याला एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकवले. माकड अडकले आणि “कोल्ह्यने मला धोका दिला” असे म्हणून ओरडायला लागले.कोल्हा म्हणाला “एवढा मूर्ख आणि लोभी प्राणी आमचा राजा व्हायचा लायकीचा नाही” आणि निघुन गेला.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …