तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते. शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत. कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात.
त्याच्या पोहंचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला. त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोप्पं असतं.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…