तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एकदा कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. खरं तर कोल्ह्याचा करकोच्याची चेष्टा करायचा करण्याचा उद्देश होता. करकोचा एक पक्षी असतो. करकोच्याची चोच फार लांब असते.
करकोचा कोल्ह्याच्या घरी आला. कोल्ह्याने जाणुनबुजुन खीर केली आणि ती उथळ भांड्यात वाढली. करकोच्याला आपल्या चोचीने त्या उथळ भांड्यातुन खाता आले नाही. कोल्ह्याने त्याची मजा बघत आपली खीर संपवली. मग “अरे तुला आज विशेष भूक नाहीये वाटतं, केवढी खीर उरली आहे.” असे म्हणुन करकोच्याची खीर पण स्वतःच संपवली. करकोचा बिचारा उपाशीच घरी गेला.
काही दिवसांनी त्याने कोल्ह्याची परतफेड करायचे ठरवले. त्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलावले. करकोचानेसुद्धा खीर केली पण ती दोघांना उंच सुरयांमध्ये वाढली. सुरई उंच आणि निमुळत्या तोंडाची असल्यामुळे कोल्ह्याला आपले तोंड त्यात घालुन ती खाताच आली नाही. करकोचाने मात्र सहज आपली लांब चोच सुरईत घातली आणि मजेत खीर खाल्ली. मग कोल्ह्याला “अरे आज तुला जास्त भूक नाहीए वाटतं” असे म्हणुन त्याची पण खीर खाल्ली. यावेळी कोल्हा उपाशी पोटी घरी गेला. करकोचाने त्याच्याच पद्धतीने “जशास तसे” करून त्याची खोडी परतवली होती.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…