तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला. द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.
तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच पुढे निघाला. एक माकड बाजूला झाडावर त्याची मजा बघत बसला होता. त्याने कोल्ह्याची मस्करी करायला विचारले “काय कोल्हेबुवा, कशी वाटली द्राक्षे?”
कोल्ह्याला आपली फजिती कबूल करावी वाटली नाही. त्याने उत्तर दिले “अतिशय आंबट. असली फालतु द्राक्षे कोण खातो? मी तर चाललो जरा चांगली शिकार शोधायला.”
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…