तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
रमेशच्या मदतीमुळे सुरेशला फार आनंद होतो. तो रमेशला वचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर रमेश गरीब बनतो. त्याला सुरेशची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने सुरेशकडे जातो. परंतु सुरेश त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
रमेशला खूप वाईट वाटत. सुरेश खूप बदललेला असतो. रमेशच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा रमेशला आणि सुरेशला बोलावतो. राजा सुरेशला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच सुरेशला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता रमेश बरोबर वाटून घ्यावी रमेशला योग्य तो न्याय मिळतो. रमेशने सुरेशला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच सुरेश रमेशला देतो. आता खरा न्याय होतो.
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…