तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला. तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला. एका कोल्ह्याने हे पाहिले. कोल्हा उपाशी होता, कावळ्याच्या चोचीत तो चीजचा तुकडा पाहुन त्याच्या तोंडाला पाणी सुटले.
तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचं प्रयत्न करू लागला. त्याचे फार कौतुक करू लागला. तो म्हणाला “लोक उगीच त्या कोकिळेचं फारच कौतुक करतात बाबा. खरं तर तुझा आवाज सुद्धा किती मस्त आहे. पण लोकांना तुझी किंमतच नाही. मला मात्र तुझा आवाज फारच आवडतो. जरा गाऊन दाखव कि.” अशी मखलाशी ऐकुन कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले. त्याने काव काव करताच तो तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला. कावळ्याची पुरती फजिती झाली.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…