तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते.
राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे. राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका.तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि 'त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.'ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.'बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते 'या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.'
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…