तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात, खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजापण या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी असतो.त्याचे त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते. स्वर्गातून देव हे सगळ पाहत असतो. देवाला ते सगळ पाहून खूप वाईट वाटत. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अक्राळ-विक्राळ कुत्रा घेऊन जातो.
कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो, भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांच्या ओरडण्याचा आवज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर, एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो.तो माणूस राजाला म्हणतो, 'माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. 'राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्यंची माफी मागू लागतात. जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच देव रुपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात. आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…