तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले. त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले.
गाढव निराश झाला.त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं? टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही.
गाढवाने ठरवले कि आता तसेच करायचे. तो फक्त गवतावर दवबिंदु चाटायला लागला. त्याने गवत आणि पाने खाणे बंद केले. त्याला त्याच्या इतर गाढव मित्रांनी फार समजावले पण त्याने काही ऐकले नाही.
दवबिंदु पिऊन गाढवाचे पोट भरणे शक्यच नव्हते. गाढव शेवटी उपासमारीने मेले पण त्याला टोळासारखे गाणे जमलेच नाही.
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…